मुंबई- भारतात हॉलिवूड सिनेमांचाही मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे, हॉलिवूडचे अनेक सिनेमे भारतात बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतात. आता २०१९ मध्ये भारतात प्रदर्शित झालेल्या टॉप ३ चित्रपटांची यादी आणि त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आलं आहे.
हॉलिवूडच्या 'या' चित्रपटांनी भारतात बॉक्स ऑफिसवर केली सर्वाधिक कमाई
‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा शेवटचा चित्रपट होता. या सिनेमानं भारतात ३६७ कोटींचं कलेक्शन केलं असून तो यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे.
‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ हा शेवटचा चित्रपट होता. या सिनेमानं भारतात ३६७ कोटींचं कलेक्शन केलं असून तो यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूडपट ठरला आहे. हा सिनेमा जगभरात २५ एप्रिलला प्रदर्शित झाला होता. सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले होते.
दुसऱ्या क्रमांकावर आहे डिजनीचा द लायन किंग. १९९४ साली आलेल्या 'द लॉयन किंग' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजीत प्रदर्शित झाला. सिनेमानं आतापर्यंत १०० कोटींचा गल्ला पार केला असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही उत्तम कमाई करत आहे. तर मार्वल स्टुडिओचा कॅप्टन मार्वल सिनेमा कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ८ मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने भारतात बॉक्स ऑफिसवर ८५.५० कोटींचा गल्ला गाठला.