महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मुंबई सागा' सिनेमाच्या प्रदर्शनाला न्यायालयाचा हिरवा कंदिल, १९ मार्चला होणार प्रदर्शित - जॉन अब्राहमचा सिनेमा 'मुंबई सागा'

'मुंबई सागा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे 'मुंबई सागा' हा सिनेमा १९ मार्च म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे.

screening of 'Mumbai Saga'
'मुंबई सागा'चे प्रदर्शन

By

Published : Mar 18, 2021, 7:14 PM IST

मुंबई- 'मुंबई सागा' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ठरल्या प्रमाणे उद्या १९ मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

गँगस्टर डीके राव उर्फ रवी बोहरा आणि मृत अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईकचे भाऊ अश्विन नाईक यांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थिगिती आणण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. 'मुंबई सागा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे 'मुंबई सागा' हा सिनेमा १९ मार्च म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे.

दरम्यान वकील प्रशांत पांडे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हणलंय की, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एका अभिनेत्याने सांगितलं की होतं की, तो अमर नाईकची भूमिका साकारतोय, याकडेही पांडे यांनी लक्ष वेधलं.

शुक्रवारी 'मुंबई सागा' सिनेमा रिलीज होणार आहे. तुम्ही शेवटच्या क्षणाला का मागणी केली, असा कोर्टाने याचिकाकर्त्यांना सवाल केलाय. कोर्टाच्या सांगण्यानुसार, नाईक कुटुंबाने २०१९ मध्ये फिल्म मेकर्सना सिनेमासंदर्भात नोटीस पाठवली होती. त्यामुळे त्यांना चित्रपटाच्या निर्मितीबद्दल माहिती होती.

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणखी एक जण ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details