मुंबई- भोजपुरी सुपरस्टार आणि नुकतंच गोरखपूरमधून विजयी झालेले भाजपचे खासदार रवी किशन यांना मोदींच्या जीवनावर आधारित भोजपुरी सिनेमा बनवायचा आहे. हा निर्णय घेण्यामागचं कारण रवी किशन यांनी नुकतंच पटनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
..म्हणून रवी किशनला बनवायचाय मोदींच्या जीवनावर आधारित भोजपुरी चित्रपट - Ravi Kishan
रवी किशन म्हणाले, स्थानिक भाषेत हा सिनेमा बनवण्यासाठी मला मोदींनीच प्रेरित केलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, काम करण्याची पद्धत, देशाबद्दलचे निर्णय या सगळ्यातून मला प्रेरणा मिळाली.
रवी किशन म्हणाले, स्थानिक भाषेत हा सिनेमा बनवण्यासाठी मला मोदींनीच प्रेरित केलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, काम करण्याची पद्धत, देशाबद्दलचे निर्णय या सगळ्यातून मला प्रेरणा मिळाली. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्व पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, असंही ते पुढे म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात मोदींचा चहाविक्रेत्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली होती.