महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विक्की कौशल आणि कियारा अडवाणी सुरू करणार 'मिस्टर लेले'चे शूट - कियारा अडवानीचे आगामी चित्रपट

शशांक खेतानच्या 'मिस्टर लेले'मध्ये वरुण धवनची जागा आता विक्की कौशल घेणार आहे.. करण जौहर निर्मित या चित्रपटात विकीच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वर्षाच्या अखेरीस निर्मात्यांनी हा चित्रपट फ्लोअर घेण्याचा विचार केला आहे.

Vicky Kaushal, Kiara Advani
विक्की कौशल आणि कियारा अडवाणी

By

Published : Feb 26, 2021, 4:07 PM IST

मुंबई- चित्रपट निर्माते शशांक खेतानचा चित्रपट 'मिस्टर लेले' दीर्घ विलंबानंतर पुन्हा ट्रॅकवर येत आहे. करण जोहरच्या या चित्रपटात सुरुवातीला वरुण धवन आणि भूमी पेडणेकर हे मुख्य भूमिका करणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र आता त्यांची जागा विक्की कौशल आणि कियारा अडवाणी या जोडीने घेतली आहे.

'मिस्टर लेले' या चित्रपटाची घोषणा २०२० मध्ये करण्यात आली होती व याचे रिलीज १ जानेवारी २०२१ रोजी होणार होते. मात्र कोविड-१९ मुळे या चित्रपटाच्या निर्मितीत अनेक अडथळे आले. यातून वरुण धवन आणि भूमी पेडणेकरने माघार घेतली.

जेव्हा करण जोहरचा महत्त्वकांक्षी बिग बजेट 'तख्त' हा चित्रपट गुंडाळण्यात आला तेव्हा हा मध्येम बजेटचा मिस्टर लेले या चित्रपटाला चालना मिळाली. ताज्या बातम्यांनुसार विकी आणि कियारा या वर्षाच्या शेवटी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. नेटफ्लिक्सवरीललस्ट स्टोरीजमध्ये विकी आणि कियारा या कलाकारांनी एकत्र काम केले आहे.

दरम्यान, विकी कौशलसाठी येणारे वर्ष खूपच बिझी आहे. पुढे यानंतर तो 'उरी' चित्रपटाचा निर्माता आदित्य धर यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या सुपरहिरो चित्रपटात दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट फ्लोअरवर जाईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विकी कौशल एका शीर्षक न ठरलेल्या चित्रपटात माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लरबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करतानाही दिसणार आहे.

कियारा अडवानी आगामी 'शेरशाह' या चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. 'भुलभुलैय्या २' आणि 'जुग जुग जिओ' या चित्रपटात कियारा कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे.

हेही वाचा - रेस्टॉरंटमधून बाहेर पडणाऱ्या दीपिका पदुकोणची फॅनने खेचली पर्स

ABOUT THE AUTHOR

...view details