मुंबई: कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे लॉकडाऊनमध्ये असलेल्या अभिनेता विक्की कौशलने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपला पहिला क्रश माधुरी दीक्षित असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर त्याने माधुरीसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे.
विकीने बुधवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या चाहत्यांशी प्रश्नोत्तराच्या सत्रात चर्चा केली. एका युजरने त्याला 'तुमचा पहिला क्रश कोण होती?,' असा प्रश्न विचारला. याला उत्तर देताना त्याने माधुरी दीक्षितसोबतचा फोटो शेअर केला आहे.