मुंबई -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कलाविश्वातील कलाकार देखील घरीच बसून आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या या वेळेचा हे कलाकार नेमका कसा सदुपयोग करतात, त्याचे विविध व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेत्री सोहा अली खान सध्या तिच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमुळे ती तिच्या कुटुंबाच्या अधिक जवळ आली, असे ती म्हणाली आहे. सध्या तिला मिळालेल्या वेळेत ती पती कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत विविध प्रयोग करताना दिसते. याशिवाय ती तिचे छंद जोपासण्यासाठी देखील वेळ देत असते. या लॉकडाऊनमध्ये ती आपला वेळ सध्या कसा घालवत आहे, याबाबत तिने संवाद साधला आहे.
वाचन -
सोहाने आपल्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगितले, की या काळात ती वाचनाला भरपूर वेळ देत आहे. लॉकडाऊनमध्ये मी दररोज किमान १ तास तरी वाचनाला देते. वाचनामुळे मला लिहिण्यासाठीही प्रेरणा मिळते. तुम्हालाही या काळात भरपूर पुस्तकं वाचता येतील, असे ती म्हणाली.
कुटुंबीयांसोबत धमाल-
कुटुंब हे नेहमीच माझ्यासाठी प्राधान्य राहिले आहे. तुमच्या कुटुंबासारखा आधार तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्ये मी माझ्या कुटुंबाच्या अधिक जवळ आली. एरवी आम्ही आमच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये इतके गुंतलेलो असतो की एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. मात्र, कुणाल देखील आता घरीच असल्याने आम्हाला आमच्या मुलीबरोबर एकत्र भरपूर वेळ मिळतो. इनायाला आम्ही दोघे मिळून चित्रकला, कोडी, रंग देणे, संख्या शिकवणे, यांसारख्या गोष्टी शिकवत आहोत.
खाद्यपदार्थांचे प्रयोग -