मुंबई- अभिनेता जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी सलमान खानच्या आगामी राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटात भावंडांची भूमिका करताना दिसतील. वास्तविक जीवनात मात्र दिशा जॅकीचा मुलगा टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दिशा सेटवर त्याला कोणत्या नावाने हाक मारली असे विचारले असता 'सर किंवा अंकल' या नावाने हाक मारत होती असे उत्तर त्याने दिलंय.
अलीकडेच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जॅकीला विचारण्यात आले होते की दिशाने त्याला सेटवर कोणत्या नावाने हाक मारली. त्यावर जॅकी म्हणाला, ''बरं, बऱ्याच वेळेला कुणीही नावाने कुणीही हाक मारत नाही. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र असतात तेव्हा ते नावाने हाका मारत नाहीत. यात काहीही सांगण्यासारखे नाही. परंतु मला जितके आठवते त्यानुसार ती मला सर म्हणून काही वेळा हाक मारत असे. अंकल बहोत अलग सा लगता है. मैं आपके बाप का भाई कैसे हो सकता? दोनो के परिवार अलग है.'', असे जॅकीने सांगितले.
टायगर आणि दिशाच्या डेटिंग अफवा गेल्या दोन वर्षांपासून पसरत असतात. मात्र अध्यापही दोघांनी याला दुजोरा दिलेला नाही. २०१९ मध्ये जॅकीने म्हटले होते की टायगर आणि दिशा 'भविष्यात लग्न करू शकतात किंवा आयुष्यभर मित्र राहू शकतात'.