महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हेमा मालिनी, सुभाष घई, अमजद अली खान यांनी बिरजू महाराजांना वाहिली श्रद्धांजली

प्रख्यात कथ्थक नृतक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहेत. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली.

बिरजू महाराज
बिरजू महाराज

By

Published : Jan 17, 2022, 10:09 PM IST

नवी दिल्ली - ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी सर्वात पहिल्यांदा सोशल मीडियावरुन पंडित बिरजू महाराज यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी महाराजांच्या काही अनमोल आठवणी शेअर केल्या. महाविद्यालयाच्या महोत्सवात बिरजु महाराज यांनी सादर केलेल्या नृत्याची आठवण त्यांनी सांगितली.

महाराजजींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये सरोद उस्ताद, उस्ताद अमजद अली खान साहब यांचा समावेश होता. त्यांनी ट्विट केले की हा भारतीय नृत्य आणि कथ्थकच्या युगाचा अंत आहे.

खान साहेबांनी लिहिले, 'हे माझे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी माझ्या कुटुंबावर जीवापाड प्रेम केले आणि त्यांच्या आठवणी नेहमी आमच्या हृदयात राहतील. स्वर्ग त्यांच्यासाठी आज आणि दररोज नृत्य करेल.

आपल्या ट्विटसोबत त्यांनी सरोदवर तबला वाजवणाऱ्या तरुण बिरजू महाराजांचे दुर्मिळ चित्र शेअर केले. एक प्रख्यात नर्तक असण्याव्यतिरिक्त, महाराज जी एक प्रतिभावान तालवादक होते आणि ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक म्हणूनही ओळखले जात होते.

खरे तर महाराजजींनी सत्यजित रे यांच्या ऐतिहासिक 'शतरंज के खिलाडी' चित्रपटामध्ये संजीव कुमार, सईद जाफरी आणि अमजद अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दोन कालखंडातील नृत्याच्या तुकड्यांसाठी संगीत दिले होते आणि गायनही केले होते.

महाराजांचे 'कथ्थक एक्सपोनंट' म्हणून वर्णन करताना, बॉलिवूडच्या दिग्गज आणि मथुरेतील लोकसभा खासदार हेमा मालिनी यांनी ट्विट केले की, "त्यांनी शेवटचा श्वास घेईपर्यंत त्यांच्या पायात घुंगरू होते. मी नेहमीच त्यांचे कौतुक आणि आदर केला आहे. कथ्थकचे माध्यम आणि नृत्य मंचावरील त्यांची उपस्थितीची मला आठवण येईल'.

महाराजांचा चित्रपट जगताशी अतूट संबंध होता. शाहरुख खान अभिनीत 'देवदास' च्या 2002 च्या आवृत्तीमध्ये मधुर दीक्षितचा समावेश असलेला 'काहे छेडे मोहे' या ट्रॅकचे नृत्यदिग्दर्शन त्यांनी केले होते.

कमल हासन यांच्या बहुभाषिक 'विश्वरूपम' या चित्रपटमध्ये 'उन्नई कानधू नान' नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटातील 'मोहे रंग दो लाल'साठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा -लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोनालिसाने शेअर केले पतीसोबतचे आकर्षक फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details