मुंबई- अभिनयातून राजकारणात उतरलेल्या खासदार हेमा मालिनी यांनी बुधवारी पती अभिनेता धर्मेंद्रसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हेमा यांनी अलीकडेच आपला वाढदिवस पती धर्मेंद्र आणि मुलगी ईशा, अहानासमवेत साजरा केला होता. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची काही झलकही त्यांनी पोस्टमध्ये दिली आहे.
पोस्ट केलेल्या या फोटोत हेमा आणि धर्मेंद्र निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. दोघांच्या या फोटोला चाहत्यांनी भरपूर कॉमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.