मुंबई -जगभरासह भारतातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी कलाविश्वातील अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील पंतप्रधान सहायता निधीमध्ये मदत दिली आहे. तसेच इतरांनाही शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हेमा मालिनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करताना दिसतात. त्यांनी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अलिकडेच त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान मदत निधीमध्ये मदत केल्याबाबत माहिती दिली. तसेच, इतरांनीही आर्थिक मदतीसाठी समोर यावे, असे आवाहन केले आहे.