महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गुंजन सक्सेना..' चित्रपटाविरुद्धच्या याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी - 'गुंजन सक्सेना..' चित्रपटाविरुध्दच्या याचिका

'गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल' या चित्रपटातील काही दृष्ये आणि संवाद यामुळे भारतीय हवाई दलाची बदनामी होत असल्याची एक याचिका दिल्लीच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

Gunjan Saxena .
'गुंजन सक्सेना.

By

Published : Aug 27, 2020, 6:52 PM IST

नवी दिल्ली -'गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल' या चित्रपटामुळे भारतीय हवाई दलाची चुकीची प्रतिमा तयार होत असल्याची भूमिका मांडणारी व नेटफल्किसवरील या चित्रपटातील काही दृष्ये आणि संवाद यांच्यावर बंदी घातली जावी यासाठी एक याचिका दिल्लीच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. जस्टिस फॉर राइट्स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने वकील अमित कुमार शर्मा यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेच्या माध्यमातून कोर्टाला विनंती करण्यात आली आहे की, चित्रपट निर्मात्याने चित्रपटात वापरण्यात येणारा आक्षेपार्ह संवाद आणि हवाई दलाची प्रतिमा कलंकित करणारी दृष्ये हटवावीत.

या चित्रपटात समाविष्ट असलेल्या काही पुरुष पात्रांमध्ये महिलांविषयी वाईट दृष्टीकोन असल्याचे दाखविण्यात आले होते, हे भारतीय हवाई दलात लैंगिक भेदभाव नसल्यामुळे सत्यतेपलीकडे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details