महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

HBD Radhika : राधिका आपटे लग्नात का नेसली होती जुनी साडी?

अभिनेत्री राधिका आपटे 36 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. 2005 मध्ये शाहीद कपूरच्या 'वाह लाईफ' चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आज ती बॉलिवूडच्या मोजक्या प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. तिच्या करियरचा ग्राफ नेहमी उंचावत राहिलाय. तिचा विवाह लंडनस्थित बेनिडिक्ट टेलर यांच्यासोबत 2012मध्ये झाले आहे. तिचा पती लंडनमध्ये राहत असतो. त्यांच्या लग्नाचा मजेशीर किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला होता.

Radhika is married to Benedict Taylor
लग्नात राधिकाने नेसली होती जुनी साडी

By

Published : Sep 7, 2021, 3:53 PM IST

मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री 36 वा राधिका आपटेचा आज वाढदिवस आहे. अनेक संघर्षातून तिने आपले स्थान पक्के केले आहे. 2005 मध्ये शाहीद कपूरच्या 'वाह लाईफ' चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र, तिला ओळख मिळाली 2011 मध्ये आलेल्या 'शोर इन द सिटी' चित्रपटामुळे. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 'अंधाधून', 'लस्ट स्टोरी', 'पॅडमॅन', 'फोबिया', 'मांझी', 'बदलापूर' आणि 'पार्चड्' यासारखे चित्रपट तिच्या नावावर आहेत.

राधिका कास्टिंग काऊचचाही ठरली होती बळी

संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात तिला खूप वाईट अनुभवातून जावे लागले. अनेकवेळा कास्टिंग काऊचचाही ती बळी ठरली होती. एका मुलाखतीत तिने याबाबतचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती, ''एकदा मला फोन आला आणि निर्माता म्हणाला तू हिरोसोबत मिटींग कर. त्याच्यासोबत तुला रहावं लागेल.'' त्यानंतर तिने नेहा धुपियाच्या शोमध्ये काही गोष्टींचा खुलासा केला होता. चित्रपटाच्या ऑडिशनच्यावेळी तिला अश्लील बोलावे लागले होते. त्यानंतर मात्र तिने असे केले नाही. राधिकाने आणखी एका गोष्टीचा खुलासा करताना म्हटले की, ''माझा पहिला दिवस होता. दक्षिणेतल्या एका प्रसिध्द अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केली. त्याच्या या कृतीमुळे मी वैतागले, कारण यापूर्वी मी त्याला कधीच भेटले नव्हते. मी लगेच त्याला थप्पड मारली.''

राधिकाने अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. 'पार्चड्' आणि 'द वेडिंग गेस्ट' या चित्रपटातील तिचे बोल्ड सीन्स खूपच चर्चेचा विषय ठरले होते. राधिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे खूप मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. अनुराग कश्यपच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये तिने काम केले होते. यातील एक बोल्ड सीन लीक झाला होता. याचा भरपूर मनस्ताप तिला सहन करावा लागला.

लंडनस्थित बेनिडिक्ट टेलरसोबत झालाय राधिकाचा विवाह

राधिकाचे लग्न बेनिडिक्ट टेलर यांच्यासोबत 2012मध्ये झाले आहे. तिचा पती लंडनमध्ये राहत असतो. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर राधिका समकालीन नृत्यशैली शिकण्यासाठी लंडनला गेली. याच दरम्यान राधिकाची बेनेडिक्ट टेलरशी मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात बदलली. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. एकमेकांच्या प्रेमात, राधिका आणि बेनेडिक्ट टेलर यांनी 2012 मध्ये शांतपणे कोर्ट मॅरेज केले. लग्नाच्या 3 महिन्यानंतर त्याने सर्वांना याबद्दल सांगितले.

लग्नात राधिकाने नेसली होती जुनी साडी

राधिकाने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की तिने तिच्या कोर्ट मॅरेजमध्ये आजीची जुनी साडी नेसली होती. या साडीमध्ये बरीच छिद्रे होती. पण आजीवर मी खूप प्रेम करीत होतीेत्यामुळे मी ती साडी नेसण्याचा निर्णय घेतला.

लग्न करण्याचे खास कारण

राधिका आणि बेनेडिक्ट हे दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यामुळे लग्न करण्याची तिला काहीही गरज वाटत नव्हती. तिचा विवाहसंस्थेवर विश्वासही नाही. राधिकाने काही काळापूर्वी सांगितले होते, ''मी लग्न केले जेणेकरून व्हिसा मिळणे सोपे होईल. मला बेनेडिक्ट सोबत राहायचे होते. पण व्हिसा मिळवणे सोपे नाही, म्हणून मी लग्न केले.''

कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान राधिका पती बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये होती. राधिका मुंबईत राहते आणि जेव्हा दोघांना वेळ मिळतो तेव्हा ते एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात.

हेही वाचा - 'आजीच्या घरी मुलं सोडून!' रिया आणि करण बूलानी पोहोचले हनिमुनला

ABOUT THE AUTHOR

...view details