महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाकी सब फर्स्ट क्लास हैं'! विकीच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत वरूणने लगावले ठुमके - varun dhawan

हा मोह विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीलाही आवरला नाही. हरलीननेही या गाण्यावर ठेका धरला असून तिच्यासोबत वरूणही थिरकताना दिसत आहे.

वरूणने धरला हरलीनसोबत ठेका

By

Published : Apr 7, 2019, 3:17 PM IST

मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कलंक' चित्रपटातील गाणी काही दिवसांपासून प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील नुकतंच प्रदर्शित झालेल्या बाकी 'सब फर्स्ट क्लास हैं' गाण्याला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. वरूणचा जबरदस्त डान्स असलेलं हे गाणं कानावर पडताच प्रत्येकाचे पाय थिरकायला लागतात.

हा मोह विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीलाही आवरला नाही. हरलीननेही या गाण्यावर ठेका धरला असून तिच्यासोबत वरूणही थिरकताना दिसत आहे. हरलीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. आता फर्स्ट क्लास की डिस्टींगशन ते तुम्हीच ठरवा, असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे.

वरूण आणि हरलीनशिवाय यात कोरिओग्राफर मेलवीन लुईसचा डान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दरम्यान कलंक चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details