मुंबई- आज देशभरात लोहरीचा सण साजरा होत आहे. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पंजाबी संस्कृतीत लोहरी अधिक प्रसिद्ध असली तरी देशाच्या कानाकोपऱ्यात या सणाची वेगळीच मजा आहे. बॉलीवूड जगतातही लोहरी उत्सव लोकप्रिय आहे. यावेळी कॅटरिना कैफ आणि विकी कौशलसह अनेक स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना लोहरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटरवर चाहत्यांना शुभेच्छा देताना अक्षय कुमारने पंजाबीमध्ये लिहिले, 'मूंगफली दी खुशबू अट्टे गुड़ दी मिठास, मक्के दी रोटी ते सरसो द साग, दिल दी खुशी अत्ते अपना दा प्यार, मुबारक होवे सारिया नू लोहड़ी दा त्योहार, हैप्पी लोहरी.
अभिषेक बच्चनने इन्स्टास्टोरीवर चाहत्यांना लोहरीच्या अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले, 'लोहरी तुमची चिंता आणि दुःख दूर करो, तुमच्या घरात आनंद आणि प्रेम येवो, लोहरीच्या शुभेच्छा.
कंगना रणौतनेही तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांना लोहरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जन्नत चित्रपटाची अभिनेत्री सोनल चौहानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या, 'तेरी किस्मत दा लिखिया तेरे तो कई खो नई सक्दा, जे हमारे दी मेहेर होवे ते तेनू ओ वी मिल जाए जो तेरा हो नई सक्दा, हॅप्पी लोहरी'.