महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Happy Holi 2022 : अमिताभ, अक्षय, कपिल शर्माने दिल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा

होळीच्या या खास आनंददायी प्रसंगी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायला बॉलिवूड स्टार विसरत नाहीत. 2022 च्या होळीच्या निमित्ताने अमिताभ बच्चनपासून कॉमेडियन कपिल शर्मापर्यंत सर्वांनी आपल्या चाहत्यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार
अक्षय कुमार

By

Published : Mar 18, 2022, 12:44 PM IST

मुंबई- आज देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजारामुळे रंगांनी भरलेला होळीचा सण फिका पडत होता. होळी साजरी करण्यासाठी चित्रपट जगत प्रसिद्ध असल्याने सेलेब्सही दोन वर्षे संयमाने बसले होते. आता बॉलीवूडमध्ये होळीचा सण दणक्यात सादरा होणार असून गेल्या दोन वर्षांची कसर भरुन काढली जाणार आहे. या खास प्रसंगी त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा द्यायला बॉलिवूड स्टार विसरत नाहीत. अशा परिस्थितीत 2022 च्या होळीच्या निमित्ताने अमिताभ बच्चनपासून कॉमेडियन कपिल शर्मापर्यंत सर्वांनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शतकातील 'मेगास्टार' अमिताभ बच्चन देशातील कोणताही सण असो, चाहत्यांना शुभेच्छा द्यायला विसरत नाहीत. बिग बींनी त्यांच्या चाहत्यांना होळी, रंगांचा आनंद आणि आनंदाचा सण यानिमित्त त्यांच्या चाहत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अमिताभ यांनी चाहत्यांना निरोगी आयुष्य आणि भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने चाहत्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. अक्षयने 'बच्चन पांडे'च्या संपूर्ण टीमच्या वतीने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडमधील अनुभवी अभिनेता आणि आपल्या अप्रतिम कॉमेडीने प्रेक्षकांना भुरळ घालणारे परेश रालाव यांनीही यावेळी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने रसिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

परेश रावल यांनी लिहिले, 'रंगांचा हा सण तुम्हाला अधिक आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा'.

टॉप कॉमेडियन कपिल शर्मा आता स्टार झाला आहे आणि त्याच्या चाहत्यांची यादी कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा कमी नाही. कपिलनेही रंगांमध्ये रंग भरायला सुरू केले असून, होळीच्या दिवशी चाहत्यांची विशेष काळजी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कपिलने होळीच्या दिवशी चाहत्यांना सांगितले की, 'तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा, हॅप्पी होळी 2022.

हेही वाचा -Happy Holi! होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निवडा ही काही खास गाणी

ABOUT THE AUTHOR

...view details