मुबंई - आज देशभर होळीचा सण साजरा होत असताना कोरोना व्हायरसची धास्तीही आहे. रंगांची उधळण करीत सणाचा आनंद लोक घेत आहेत. बॉलिवूडमध्येही होळीची धूम आहे. बॉलिवूड सेलेब्रिटीजनी आपल्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्लाही दिलाय.
ऋषि कपूर, तापसी पन्नू, अनुपम खेर आणि दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक बॉलिवूड सिताऱ्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी कपूर यांनी लहानपणीचा होळी खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. ऐश्वर्या राय बच्चननेही आराध्यासोबत होळी खेळतानाचा फोटो शेअर केलाय.
ऋषी कपूर यांच्या लहानपणीच्या फोटोत ते रंगात रंगलेले दिसतात. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, सर्वांना सुरक्षीत होळीच्या शुभेच्छा. कोरोना पासून सावध रहा.
अभिनेत्री तापसी पन्नूने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांचे एक ट्विट शेअर केला आहे. होळीच्या सुट्टीमध्ये थप्पडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होईल असे त्यांनी लिहिले होते.