महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Happy Birthday Ranveer : बॉलीवूडमधील एनर्जेटिक अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लहान वयातच ‘हिरो’ बनण्याची स्वप्नं पाहणारा रणवीर लहानपणापासून जोपासलेली स्वप्नं जगतोय. उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर सिनेमे करत आहे. चांगल्या भूमिकांसाठी त्याचा विचार होतोय. जाहिरात क्षेत्रात त्याची चलती आहे आणि सध्या सर्वात जास्त जाहिराती रणवीरचं करतोय. या बाबतीत त्याने अमिताभ, शाहरुख सारख्या सुपरस्टार्सना मागे टाकले आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री (दीपिका पदुकोण) त्याची बायको आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे.

ranveer
ranveer

By

Published : Jul 6, 2021, 6:36 AM IST

Updated : Jul 6, 2021, 7:09 AM IST

मुंबई -सध्याच्या घडीला खळखळून वाहत्या झऱ्यासारख्या वागणारा अभिनेता एकच आहे, रणवीर सिंग. त्याच्याबाबतीत असं म्हणता येईल की, तो आला, त्यानं पाहिलं आणि आपल्या एनर्जीने सर्वांना जिंकलं. यात प्रेक्षक तर आलेच परंतु फिल्म इंडस्ट्री मधील निर्माते दिग्दर्शक हिरॉइन्स आणि हिरोज् सुद्धा आहेत. प्रत्येकजण रणवीरच्या निरागस मस्तीचे चाहते आहेत. ६ जुलै अर्थात आज रणवीरचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'कडून रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा...

happy birthday ranveer
अगदी लहान वयातच ‘हिरो’ बनण्याची स्वप्नं पाहणारा रणवीर लहानपणापासून जोपासलेली स्वप्नं जगतोय. उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर सिनेमे करत आहे. चांगल्या भूमिकांसाठी त्याचा विचार होतोय. जाहिरात क्षेत्रात त्याची चलती आहे आणि सध्या सर्वात जास्त जाहिराती रणवीरचं करतोय. या बाबतीत त्याने अमिताभ, शाहरुख सारख्या सुपरस्टार्सना मागे टाकले आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री (दीपिका पदुकोण) त्याची बायको आहे आणि त्याचा त्याला अभिमान आहे. गेल्यावर्षी जेव्हा दीपिकाला एनसीबीने चौकशीसाठी बोलाविले होते तेव्हा रणवीर खूपच चिंताग्रस्त होता. आणि आपल्या बायकोसोबत चौकशीवेळी हजर राहण्याची परवानगी मागत होता. दीपिकाने तो कठीण काळ रणवीरच्या खंबीर पाठिंब्यामुळे धीराने काढला. रणवीर दीपिकाने नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते आणि डिसेंबर २०१८ ला ‘सिम्बा’ प्रदर्शित झाला होता. ‘सिम्बा’ च्या प्रोमोशनवेळी रणवीर ला विचारले होते की ‘तू कोणत्या टाईपचा बॉयफ्रेंड आहेस?’ त्यावेळी त्याने लगेचच आपल्या जोशपूर्ण अंदाजात म्हटले, ‘ मी आता बॉयफ्रेंड नाहीये, दीपिका चा नवरा आहे.’ त्यावेळी खूप हशा पिकला होता.
ranveer singh
एनर्जेटिक रणवीर
मराठी चित्रपटसृष्टीमधील सिद्धार्थ जाधव याला एनर्जीची खाण म्हणतात परंतु तो म्हणतो की रणवीर सिंग ‘एनर्जी उत्पादन केंद्र’ आहे. माझी एनर्जी त्याच्यापुढे फिकी आहे. रणवीर मराठी कलाकारांचा आदर करतो. त्यांच्या मते रणवीर जितका चांगला अभिनेता आहे त्याहूनही जास्त चांगला माणूस आहे. परंतु, रणवीरने सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं. अनेक ठिकाणी नकारघंटा ऐकून तो निराश व्हायचा. परंतु त्याने जिद्द सोडली नाही. जेव्हा तो त्याचा पहिला चित्रपट ‘बँड बाजा बरात’ करीत होता, ज्याची यशराज फिल्म्स निर्मिती करीत होती, त्यावेळी शूटिंगला करण जोहर आला होता. रणवीर ला पाहून तो त्याच्या ढंगात बोलला होता की, ‘ये हिरो हैं?’ आणि नाक मुरडून निघून गेला होता. आजच्या घडीला रणवीर सिंग करण जोहरचा लाडका नट आहे. ‘सूर्यवंशी’ च्या ट्रेलर लाँचवेळी त्याने भर समारंभात आपल्या मिश्किल अंदाजात सांगितले की, “रोहित (शेट्टी) ने अजय (देवगण), मी आणि आता अक्कीभाईला (अक्षय कुमार) घेऊन मी चित्रपट बनवलेत. आता तो त्याच्या ‘पोलीस युनिव्हर्स’ चा पुढचा भाग काढतोय आणि त्यात ‘कडक इन्स्पेक्टर’ची प्रमुख भूमिका करण जोहर करणार आहे.” करण जोहरची ‘चाल’ आठवत सर्वजण खळखळून हसले. दुसरीकडे रणवीर प्रांजळपणे बोलला की, “मला कल्पना आहे की काही मदनाचा पुतळा नाही. बँड बाजा बरात करीत असताना आदित्य चोप्राही मला म्हणाला होता की, ‘तुझा चेहरा पोस्टरवर लावण्याइतपत ग्रेट नाहीये. परंतु, मी तुला तुझा अभिनय पाहून निवडले’.

ranveer
‘सूर्यवंशी’ च्या त्याच पोस्टर लाँचला अक्षय कुमार, अजय देवगण, रोहित शेट्टी, करण जोहर आणि कतरीना कैफदेखील वेळेत पोहोचले होते परंतु रणवीर चा पत्ता नव्हता. तो तब्बल ४०-४५ मी. उशिराने आला आणि ‘सूर्यवंशी’ टीम ने, खासकरून अक्षय कुमारने त्याला शिक्षा म्हणून उठाबशा काढायला लावल्या होत्या (अर्थातच विंगेत). तरीही रणवीरची मस्करी सुरूच होती. तो म्हणाला (अर्थातच विंगेत), ‘तुम्ही सर्व इथे आजूबाजूलाच राहता. मी किती लांबून आलोय. सध्या रस्त्यावर ‘मेट्रो’ चे काम सुरु असल्यामुळे मला ट्राफिक जाम लागला. एकतर मी बायकोसोबत राहतो आणि माझी बायको ‘टाऊन’ मध्ये राहते.’ (हा इव्हेन्ट अंधेरी लिंक रोड ला होता आणि सर्व स्टार्स आजूबाजूला जुहू परिसरात राहतात आणि दीपिकाचे घर प्रभादेवीला आहे.) त्यामुळे सर्वजण हसू लागले. रणवीर सिंगला विचारले होते की त्याला ‘सिम्बा’ कसा मिळाला. तो म्हणाला की, “कसा मिळाला? मिळाला नाही, मी मिळवला.
असा मिळाला 'सिंबा' चित्रपट
मला रोहित शेट्टी सोबत काम करण्याची मनीषा होती. तो मला इतक्यात बोलावेल ही शक्यता कमीच होती. मी संधीची वाट पाहत होतो. तेव्हड्यात माझ्याकडे जी जाहिरात होती त्यांना सिनेमा धर्तीवर मारधाड असणारी ‘लॅव्हिश’ ऍड हवी होती. त्यांचे बजेटही तगडे होते. मी सरळ रोहित शेट्टी कडे गेलो आणि सांगितले की ही ऍड फक्त तूच करू शकतो आणि बजेटचीही चिंता नाहीये. आम्ही ती ऍड केली आणि ती प्रचंड गाजली. त्याच सुमारास रोहित ने सांगितले की माझ्याकडे एक कथा आहे. तू करशील का? मी ताबडतोब होकार दिला. तो म्हणाला ‘अरे आधी स्टोरी तर ऐक’. मी म्हणालो मला स्टोरीत इंटरेस्ट नाही, तुझ्याबरोबर काम करण्यात इंटरेस्ट आहे. आणि तू चित्रपट बनविणार म्हणजे चांगलाच बनविणार. तारखा कुठल्या देऊ? ....आणि ‘सिम्बा’ जन्माला आला.”रणवीर सिंग नजीकच्या काळात यशराज फिल्म्सच्या ‘जयेशभाई जोरदार’ मध्ये दिसेल. तसेच तो रोहित शेट्टी बरोबर अजून एक सिनेमा करतोय, ‘सर्कस’. त्याचबरोबर त्याचे ‘८३’, ‘सूर्यवंशी’ प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. रणवीर सिंग ला ईटीव्ही भारत मराठी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Last Updated : Jul 6, 2021, 7:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details