बॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक हंसल मेहता यांनी अमिताभ बच्चन यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा त्यांच्या करियरच्या सुरूवातीच्या काळातील आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर जोरदार पसरलाय. तुमचे फेवरेट सेलेब्रेटी कसे भेटले हा ट्रेंड सध्या सोशल मीडियात सुरू आहे. याला प्रतिसाद देत मेहता यांनी हा किस्सा लिहिलाय.
मेहता यांनी लिहिलंय,"मी माझ्या करियरला नुकतीच सुरूवात केली होती आणि एक पत्र मी बच्चन साहेबांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास माझी आई म्हणाली की तुला अमिताभचा फोन आलाय. त्यावेळी माझा सहाय्यक एडिटर अमिताभ वर्मा होता."
हंसल मेहता पुढे लिहितात, "मी फोन उचलला आणि म्हटले बोल अमिताभ, त्याच्या उत्तरादाखल समोरुन आवाज झाला, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ."