महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जॉन अब्राहम, अर्शद वारसी, अनिल कपूर आणि पुलकित सम्राट यांच्या 'पागलपंती'चे हॅलोविन पोस्टर - , Anil Kapoor latest news

'पागलपंती' चित्रपटाच्या हॅलोविन पोस्टरमध्ये प्रत्येक कलाकाराचं पात्र नेमकं कसं आहे, याची झलक पाहायला मिळते. प्रत्येकजण यामध्ये 'पागलपंती' करताना दिसतो.

'पागलपंती'चे हॅलोविन पोस्टर

By

Published : Oct 31, 2019, 3:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, अर्शद वारसी, अनिल कपूर आणि पुलकित सम्राट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'पागलपंती' चित्रपटाची चार नवी पोस्टर्स रिलीज झाली आहेत. आज जगभर हॅलोविन हा सण साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर ही अनोखी पोस्टर्स चर्चेचा विषय ठरली आहेत.

'पागलपंती' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये अरशद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला यांसारखी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या 'पागलपंती' चित्रपटाची उत्सुकता वाढत चालली आहे. यापूर्वीही अनेक वेगळ्या लूकची पोस्टर्स रिलीज झाली होती.

या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो 'राज किशोर' हे पात्र साकारत आहे.

दिग्दर्शक अनिस बज्मी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, भूषण कुमार, कृष्ण कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लंडन आणि लीडस यांसारख्या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं आहे. मुंबईच्या काही भागांमध्येही हा चित्रपट शूट करण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details