महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

या उद्योगपतीच्या बायोपिकसाठी गुलजार-रहमान पुन्हा येणार एकत्र - Subrata Roy Biopic

गीतकार गुलजार आणि संगीतकार ए आर रहमान पुन्हा एकदा उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या बायोपिकमध्ये एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट सहारा समूहाच्या अध्यक्षांच्या जीवनावर आधारित असेल.

गुलजार-रहमान पुन्हा येणार एकत्र
गुलजार-रहमान पुन्हा येणार एकत्र

By

Published : Sep 9, 2021, 8:43 PM IST

मुंबई - अकादमी पुरस्कार विजेते गीतकार गुलजार आणि संगीतकार ए आर रहमान पुन्हा एकदा उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या बायोपिकमध्ये एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट सहारा समूहाच्या अध्यक्षांच्या जीवनावर आधारित असेल. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंह यांच्या लीजेंड ग्लोबल स्टुडिओच्या बॅनरखाली होणार आहे.

या चित्रपटाद्वारे गुलजार आणि रहमानची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. याआधी या जोडीने 'दिल से', 'गुरु', 'युवराज' आणि ऑस्कर विजेते 'स्लमडॉग मिलियनेअर' सारख्या चित्रपटांची गाणी केली होती आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

रहमानसोबत पुन्हा एकदा काम करीत असलेले गुलजार म्हणाले की, त्याच्यासोबत काम करणे खूप शानदार असेल. 87 वर्षीय गुलजार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "सुब्रत रॉय यांचे जीवन रहस्यमय आणि प्रेरणादायी आहे. रहमान एक अद्भुत कलाकार आणि संगीतकार आहे आणि मी त्याच्याबरोबर काम करण्यास खूप उत्सुक आहे.''

गुलजार यांच्यासोबत पुन्हा काम करण्याच्या निमित्ताने रहमान यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले की, "गुलजार साहेबांची भावपूर्ण गाणी एका संगीतकारासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत आणि मला आशा आहे की मी चित्रपटाच्या गीतांना आणि कथेला न्याय देऊ शकेन. मी त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.''

या चित्रपटाचे शीर्षक आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जातील.

हेही आहे - सौरव गांगुलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'दादा'च्या बायोपिकची झाली घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details