मुंबई - रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला 'गली बॉय' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाकडून चाहत्यांनी मोठी अपेक्षा बाळगली होती. भारतातील प्रेक्षक जरी नाराज असले तरी कंगना रानावतची बहिण रंगोली चंदेल मात्र खूश आहे. तिच्या मते हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाचा कॉपी होती.
'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, निवड चुकल्याची रंगोली चंदेलची टीका - Zoya Akhtar latest news
गली बॉय ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. याचे इतरांना दुःख असले तरी रंगोली चंदेलने समाधान व्यक्त करीत टीका केली आहे.
'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
रंगोलीने ट्विट करुन म्हटलंय, "गली बॉय चित्रपट हा हॉलिवूडच्या '८ माईल' चित्रपटावर आधारित होता. इथल्या मुव्हा माफिया चाटूकार क्रिटिक्स यांच्या चाटण्याने काय होतंय. उरी किंवा मनिकर्णिकासारखा ओरिजनल कंटेंट नव्हता. हॉलिवूड अशा चित्रपटांना का पुरस्कार देईल?."
रंगोलीने आलियावर आणि करण जोहरवर यापूर्वीही भरपूर टीका केली आहे. आलिया भट्टला बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाल्यानंतर रंगोलीने तिच्यावर टीका करीत एक व्हिडिओ शेअर केला होता.