महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गली बॉय' रणवीरची बॉक्स ऑफिसवर पुन्हा छाप, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग - बॉक्स ऑफिस

'अपना टाईम आयेगा' म्हणत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार ओपनिंग करत प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 'सिम्बा' चित्रपटानंतर रणवीर सिंग 'गली बॉय'मधून पुन्हा एकदा चाहत्यांवर छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे.

रणवीर सिंग

By

Published : Feb 15, 2019, 12:56 PM IST

मुंबई- 'अपना टाईम आयेगा' म्हणत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार ओपनिंग करत प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 'सिम्बा' चित्रपटानंतर रणवीर सिंग 'गली बॉय'मधून पुन्हा एकदा चाहत्यांवर छाप पाडण्यात यशस्वी ठरला आहे.



चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'गली बॉय'च्या पहिल्या दिवशीच्या कमाईची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. तब्बल ३३५० स्क्रिन्सवर झळकलेल्या 'गली बॉय'ने पहिल्याच दिवशी १८.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे 'गली बॉय' शुक्रवारी प्रदर्शित न करता 'व्हॅलेन्टाईन डे'ला प्रदर्शित करण्यात आला. तरीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

'गली बॉय'च्या पहिल्या दिवशीचे आकडे पाहता हा चित्रपट विकेंडलाही दमदार कमाई करेल, असा विश्वास चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे. आता 'गली बॉय'च्या कमाईत आणखी किती भर पडते. हा चित्रपट 'सिम्बा'ला मागे टाकेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details