मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'गुलाबो-सिताबो' चित्रपटातील आयुष्यमान खुराणा याचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
'गुलाबो सिताबो' : अमिताभसोबतचा आयुष्यमानचा फर्स्ट लूक - Amitabh Bachchan latest news
'गुलाबो सिताबो' या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत आयुष्मान खुराणा झळकणार आहे. सुजीत सरकार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
पुढच्या वर्षी २४ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार असे अगोदर जाहीर करण्यात आले होते. मात्र ही तारीख आता बदलली असून दोन महिने आधीच याचे प्रदर्शन होणार आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहत दाखल होणार असल्याचे ट्विट करण आदर्श यांनी केलंय.
त्यांच्या अभिनयासोबतच चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या लूक्समुळेही लोकप्रिय आहेत. बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या लूक्सवर प्रयोग केले आहेत. काही काही लूक्समध्ये तर त्यांना ओळखणंही कठिण जातं. अशाच प्रकारचा लूक त्यांच्या आगामी 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्यांचा पहिला लूक पाहून तुम्हालाही त्यांना ओळखता येणार नाही. आता या चित्रपटातील आयुष्यमानचा लूकही प्रदर्शित झाल्यामुळे चाहते सुखावले आहेत.