महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गुलाबो सिताबो : बिग बी आणि आयुष्यमानच्या व्यक्तीरेखांचे तापसीने केले कौतुक - दिग्दर्शक शुजित सरकार यांचे कौतुक

तापसी पन्नू हिने गमतीशीर विनोदी गुलाबो सीताबोच्या कथेसाठी दिग्दर्शक शुजित सरकार यांचे कौतुक केले आणि लेखिका जूही चतुर्वेदी यांचे अभिनंदन केले. या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या अभिनयाचेही तापसीने कौतुक केलंय.

Gulabo Sitabo
गुलाबो सिताबो

By

Published : Jun 13, 2020, 4:36 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूने कालच रिलीज झालेल्या शुजित सरकार यांच्या गुलाबो सिताबो या चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपट पाहताना आनंद झाल्याचे तिने सोशल मीडियावर लिहिले आहे. हा चित्रपट सुंदर वाटल्याचे तिने म्हलंय.

जेव्हा चांगले कलाकार अशा आकर्षक भूमिका साकारतात तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक सुंदर भावना निर्माण होते, असे तापसीने म्हटलंय.

दिग्दर्शक शुजित सिरकर आणि लेखक जूही चतुर्वेदी यांचे अभिनंदन करताना तापसी लिहिते, ''पडद्यावर किती सुंदर जग निर्माण केलेत.''

चित्रपटाचे कौतुक करीत असताना तापसीने अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांनी साकारलेल्या व्यक्तीरेखांचेही कौतुक केलंय.

शुक्रवारी गुलाबो सिताबो हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. त्यानंतर चित्रपट पाहून असंख्य चाहत्यांनी आपल्या पसंतीची पोचपावती नेटवरुन द्यायला सुरूवात केली आहे. अनेकांना सिनेमाचे रिव्ह्यूही दिलेत. संमिश्र असलेल्या या रिव्ह्यूमध्ये अमिताभ आणि आयुष्यमानच्या व्यक्तीरेखांचे कौतुक करायला मात्र कोणीही विसरलेले नाही.

गुलाबो सिताबो हा चित्रपट १७ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे हे चित्र बदलले. पुन्हा कधी थिएटर्स सुरू होणार याची शाश्वती नसल्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काल १२ जूनला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details