मुंबई- अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांच्या मुख्य भूमिका असलेला गुलाबो सिताबो हा सिनेमा आज अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. मात्र, रिलीजच्या काही तासात हा सिनेमा लिक झाला आहे. या बॉलिवूड सिनेमाला पायरसीचं ग्रहण लागलं आहे. 'तामिळ रॉकर्स' या वेबसाईटवर हा सिनेमा एचडी व्हर्जनमध्ये फ्री डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. तर, टेलिग्राम या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरदेखील तो लिक झाल्याची चर्चा आहे.
'गुलाबो सिताबो'ला पायरसीचं ग्रहण, रिलीजनंतर काही तासातच सिनेमा लीक
थेट ओटीटीवर रिलीज होणारा हा बॉलिवूडमधील पहिला मोठा सिनेमा होता. त्यामुळे, सगळ्यांचे लक्ष सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे होते. अशात हा सिनेमा रिलीज झाल्याच्या काही तासातच त्याची पायरसी झाल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म हा पायरसीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालं आहे.
लॉकडाऊनच्या काळात सिनेमागृहं बंद असल्याने या सिनेमाच्या निर्मात्यांनी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पडद्यावर रिलीज होणारा अमिताभ बच्चन यांचा या हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यांच्या फॅन्सना या सिनेमाचं विशेष कौतुक होतं. तर आयुष्यमाननंही यानिमित्ताने पहिल्यांदाच महानायकासोबत काम केल्याने त्याच्यासाठीही हा चित्रपट खास होता. दुसरीकडे थेट ओटीटीवर रिलीज होणारा हा बॉलिवूडमधील पहिला मोठा सिनेमा होता. त्यामुळे, सगळ्यांचे लक्ष सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे होते. अशात हा सिनेमा रिलीज झाल्याच्या काही तासातच त्याची पायरसी झाल्याने ओटीटी प्लॅटफॉर्म हा पायरसीच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याचं सिद्ध झालं आहे.
सुजित सरकार यांचं दिग्दर्शन तर जुही चतुर्वेदीची कथा या 'गुलाबो सिताबो' सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. यापूर्वीदेखील या दोघांच्या जोडीने पिकूसारखा यशस्वी सिनेमा दिलेला आहे. 'गुलाबो सिताबो'मध्ये अमिताभ एका घरमालकाच्या भूमिकेत आहेत. तर, आयुष्मान त्यांच्या भाडोत्रीच्या भूमिकेत आहे. सिनेमा रिलीज झाल्याच्या काही तासात त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांनी आपली पसंती दिली आहे. ओटीटीवर रिलीज झाल्याने अमेझॉनने तो 200 देशांमध्ये एकाच वेळी 15 भाषांमध्ये भाषांतरित करून रिलीज केला आहे. एवढं करूनही पहिल्याच दिवशी सिनेमाची पायरसी झाल्याने या सिनेमाला त्याचा किती फटका बसतो हे काही दिवसातच समजेल.