मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री मिथिला पालकर म्हणाली की ती काजोलला पाहतच मोठी झाली आहे. त्याबरोबरच तिने काजोलसोबतच्या फॅन मोमेंटचीही आठवण काढली.
मिथिलाने 'लिटिल थिंग्ज' वेब सीरिज आणि रोमंँटिक कॉमेडी असलेल्या 'कारवां' चित्रपटामध्ये काम केले आहे. ती काजोलच्या आगामी ‘त्रिभंगा’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केले आहे.
हेही वाचा- ट्विटरवर शांत राहण्याचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने दिले प्रत्युत्तर
अभिनेत्री मिथिला म्हणाली, "मी काजोलला पाहात मोठी झाले आहे. आणि जेव्हा मला हे समजले की, मी तिच्याबरोबर काम करणार आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. मी नव्वदच्या दशकातील मुलगी आहे आणि काजोलला पाहात मोठी झाली आहे. तिच्यासोबत काम करणार असल्यामुळे थोडी भीती वाटत आहे. पण जेव्हा ती सेटवर भेटली त्यानंतर मी नॉर्मल झाले. तिचे हास्य खूप प्रभावी आहे. ती खूप एनर्जेटिक आहे. ती मनापासून हसते आणि मनमोकळेपणाने बोलते.''