मुंबई - बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉस १४च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सिनेमाच्या शूटिंगलाही सुरूवात करीत आहे. सलमान आपल्या आगामी 'राधे' सिनेमाचे शूटिंग २ ऑक्टोबरपासून सुरू करीत आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये हे शूटिंग चालू होईल.
'राधे' चित्रपटाचे शूटिंग १५ दिवस एनडी स्टुडिओत चालणार आहे. त्यानंतर त्याचे पॅचवर्कचे काम मुंबईच्या मेहबूब स्टुडिओत पार पडेल. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे यावेळी पालन करण्यात येणार आहे. सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षेचा विचार करुन शूटिंग होईल.