महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘ओम : द बॅटल विदिन’ मधील रक्त उसळवणाऱ्या अ‍ॅक्शन्ससाठी उभारला गेलाय भव्य सेट! - ओम: द बॅटल इनर' साठी भव्य अ‍ॅक्शन सीक्वेन्स

दिग्दर्शक अहमद खान यांनी गेल्या वर्षी दिग्दर्शित केलेला टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर अभिनित ‘बागी ३’ प्रदर्शित झाला होता व त्याला उत्तम प्रतिसादही मिळत होता. आता अहमद खान आता एका नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय ज्याचे नाव आहे 'ओम : द बॅटल विदिन'.

'Om: The Battle Within'
‘ओम : द बॅटल विदिन’

By

Published : Feb 15, 2021, 3:55 PM IST

दिग्दर्शक अहमद खान त्याच्या नृत्यदिग्दर्शनाबरोबरच अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी देखील ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने दिग्दर्शित केलेला टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर अभिनित ‘बागी ३’ प्रदर्शित झाला होता व त्याला उत्तम प्रतिसादही मिळत होता. परंतु कोरोनाच्या आगमनामुळे सर्व चित्रपटगृहे बंद झाली व इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटालाही मिळालेल्या उत्पन्नावर समाधान मानावे लागले. आता अहमद खान आता एका नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करतोय ज्याचे नाव आहे 'ओम : द बॅटल विदिन'.

‘ओम : द बॅटल विदिन’
'ओम : द बॅटल विदिन' चे शूटिंग गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असून आता अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस शूट होणार आहेत व त्यासाठी जबरदस्त सेट उभारला गेला आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि संजना सांघी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात आदित्य डॅशिंग लुकमध्ये दिसणार असून त्याने त्यासाठी दणकट शरीर बनविले आहे. या चित्रपटात रक्त उसळवणाऱ्या अ‍ॅक्शन्स दिसणार असून त्यासाठी स्पेशल अ‍ॅक्शन्स डिझाईन करण्यात आल्या आहेत. फिल्मसिटी प्रांगणात झी स्टुडिओ आणि अहमद खान यांनी एक किलोमीटर व्यासाचा सेट तयार केला आहे. मुख्य कलाकारांनी शूटसाठी सर्व आवश्यक तयारी केली आहे. प्रख्यात आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक महत्त्वाच्या अ‍ॅक्शन सिक्वन्सचे शूटिंग आणि नृत्य दिग्दर्शन करण्यासाठी उत्सुक आहेत.अ‍ॅक्शन सिक्वेन्सेसबद्दल बोलताना निर्माता अहमद खान म्हणाला, “आम्ही 'ओम: द बॅटल इनर' साठी भव्य अ‍ॅक्शन सीक्वेन्स डिझाईन केलेले आहेत, ज्याचे चित्रण येत्या काही दिवसात केले जाईल. याआधीही माझ्यासोबत काम केलेले अ‍ॅक्शन डायरेक्टर केचा खामफाकडी यांनी परवेझ शेख सोबत हे अ‍ॅक्शन सीक्वेन्स कोरिओग्राफ केले आहे. ते शूट पाहून आमचं रक्त उसळत असते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहणे फार रोमांचक असेल." हे शेड्युल संपल्यावर ‘ओम’ची टीम या गाण्यांचे चित्रीकरण करणार असून शेवटचे शेड्युल परदेशात चित्रित केले जाणार आहे. झी स्टुडीओज, अहमद खान आणि शाईरा खान प्रस्तुत व पेपर डॉल एंटरटेनमेंट प्रॉडक्शन, झी स्टुडिओ आणि अहमद खान निर्मित, ‘ओम : द बॅटल विदिन’ चे दिग्दर्शन कपिल वर्मा करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details