महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

संध्याकाळी दारुची दुकाने सुरू ठेवा - ऋषी कपूर - संध्याकाळच्यावेळी दारुची दुकाने सुरू ठेवा - ऋषी कपूर

लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकाने काहीवेळासाठी उघडी ठेवण्याची मागणी अभिनेता ऋषी कपूर यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर भरपूर प्रतिकिया येत आहेत.

Rishi Kapoor
ऋषी कपूर

By

Published : Mar 28, 2020, 7:04 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरमुळे देशभर लॉडकडाऊनची परिस्थिती आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी लोक धडपड करीत आहेत. सरकारच्यावतीने यासाठी काही ठोस पावले उचलली जात आहेत. लोक घरात अससल्यामुळे काहीजण तणावात आहेत. अशावेळी दारुची दुकाने बंद असल्यामुळे त्यातील काहींची अस्वस्थता वाढली आहे. काही वेळासाठी दारुचे दुकाने उघडावीत अशी मागणी दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांनी केली आहे.

दारुमुळे सरकारच्या उत्पन्नातही भर पडत असते, याचा दाखल देत त्यांनी निराशेच्या वातावरणात लोकांना रिलॅक्स होण्यासाठी दारु उपलब्ध व्हावी अशा मागणी सरकारकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''विचार करा. सरकारने संध्याकाळच्यावेळी सरकारी मान्यता प्राप्त दारुची दुकाने उघडली पाहिजेत. मला चुकीचे समजू नका. लोक घरामध्ये आसपासच्या निराशेतून राहात आहेत. पोलीस, डॉक्टर्स, सिव्हीलियन्स इत्यादींना थोड्या श्रमपरिहाराची गरज आहे. ब्लॅकमध्ये तर मिळत आहे.''

पुढील ट्विटमध्ये ऋषी कपूर यांनी लिहिलंय, ''राज्य सरकारांना उत्पादन शुल्कापासून धनाची सक्त आवश्यकता आहे. निराशेला तणावात जोडले जाऊ नये. अखेर पित तर आहेतच, मग त्याला कायदेशीर स्वरुप द्या. हे पाखंड नाही, माझे विचार आहेत.''

अशा प्रकारे ऋषी कपूर यांनी काही वेळासाठी दारुची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या ट्विटवर खूप लोक प्रतिक्रिया देत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details