महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘गुगल’ ने विद्युत जामवालला बसविले मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीच्या पंक्तीत! - ब्रूस लीच्या पंक्तीत विद्युत जामवाल

आपल्या चित्रपटांतून मार्शल आर्टस् स्वतः, डुप्लिकेट न वापरता, करणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. त्याचे नाव आता आता ब्रूस लीसह जॅकी चान, जेट ली, चक मॉरिस, डोनी येन, टोनी यांच्या यादीत जोडले गेले आहे.

Vidyut Jamwal
विद्युत जामवाल

By

Published : Feb 12, 2021, 7:49 PM IST

मुंबई - ली जून-फॅन हे ‘मार्शल आर्टिस्ट’ व चायनीज-अमेरिकन अभिनेता-दिग्दर्शक ब्रूस ली चे खरे नाव, ज्याने ‘मार्शल आर्टस्’ जागतिक नकाशावर नेऊन ठेवले. त्याने पूर्व व पश्चिम खंडांतील दुरी आपल्या चित्रपटांद्वारे निमुळती केली. त्यानंतर जॅकी चॅनने एकलव्याप्रमाणे त्याला गुरु मानत चित्रपटांतील मार्शल आर्टस्ची परंपरा सुरु ठेवली आहे. जेट ली, चक मॉरिस, डोनी येन, टोनी जा आणि स्टीव्हन सीगल हे देखील या प्रांतातील दिग्गज आहेत. आता त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे आपला एक भारतीय कलाकार. आपल्या चित्रपटांतून मार्शल आर्टस् स्वतः, डुप्लिकेट न वापरता, करणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल, याचे नाव वरील दिग्गजांसोबत जोडले गेले आहे.

‘गुगल’ ने विद्युत जामवालला बसविले ब्रूस लीच्या पंक्तीत
गुगल जॅकी चॅन, ब्रूस ली, जेट ली, चक मॉरिस, डोनी येन, टोनी जा आणि स्टीव्हन सीगल अशा दिग्गजांना जगातील अव्वल मार्शल आर्टिस्ट म्हणून अधिकृतपणे ओळखते. आतापर्यंत या यादीत कोणत्याही भारतीयाचे नाव नव्हते. परंतु भारत आता जागतिक स्तरावर मान मिळवू लागला असून चित्रपटसृष्टीही मागे नाही. भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेता, ज्याने कालारीपयट्टू चे अधिकृत शिक्षण घेतले आहे, विद्युत जमवाल ने जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अ‍ॅक्शन दिग्गजांसह हा मान सामायिक केला आहे व या पंक्तीतील सर्वात तरुण फिटनेस स्टार बनला आहे. कालारीपयट्टू - मार्शल आर्टच्या प्राचीन प्रकाराला पुनरुज्जीवित करणारा, ‘खुदा हाफिज’ कलाकार विद्युत जामवाल तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. त्याने समाज माध्यमांवर आपल्या मार्शल आर्ट्सच्या दिनचर्या यांचा समावेश असलेल्या #AbYehKarkeDikhao आणि #ITrainLikeVidyutJammwal सारख्या रंजक ट्रेंड्स सुरु ठेवल्या आहेत. त्याच्या व्हायरल व्हिडिओंमध्ये तो पाण्यावरून चालत जाणे, विटा तोडणे, बिअर बाटली पुशअप्स करणे आणि अकल्पित प्रकारचे जिम्नॅस्टिक असे वैशिष्ट्यीकृत कृत्ये असतात.विद्युत जमवालच्या सिनेमात नेहमीच मार्शल आर्टस् प्रकारातील स्टंट्स, ॲक्शन्स असतात त्या प्रेक्षणीय आणि विलोभनीय वाटतात आणि महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या ॲक्शन्स साठी विद्युत डुप्लिकेट्स अजिबात वापरत नाही. त्याची 'कमांडो' चित्रपट-सिरीज तुफान हिट गेलीय ती त्याच्या डोळे विस्फारित करणाऱ्या मार्शल आर्टस् स्टंट्स मुळे. जगातील १० श्रीमंत लोक, ज्यांच्यासोबत कोणी पंगा घेऊन इच्छित नाही या यादीमध्ये त्याचे नाव असून तो भारतीयांचा सन्मान आहे. आता तर ‘गुगल’ ने अधिकृतरीत्या विद्युत जामवाल ला ब्रूस ली, जेट ली, चक मॉरिस, डोनी येन, टोनी जा, स्टीव्हन सीगल आणि जॅकी चॅन च्या पंक्तीत नेऊन बसविले आहे याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details