मुंबई - आपल्या सूत्रसंचालनामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता जय भानूशाली आणि छोट्या पडद्यावरील मालिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली माही गिल यांच्या घरी नव्या परीचे आगमन झाले आहे. माहीनं आज सकाळी गोंडस मुलीला जन्म दिला असून या दोघांनीही सोशल मीडियावरुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.
पालक म्हणून आम्हाला निवडण्यासाठी धन्यवाद, जय भानुशालीच्या घरी परीचं आगमन - लग्नगाठ
जयनं आपल्या लहान परीच्या पायाला किस करतानाचा फोटो पोस्ट करत त्याला खास कॅप्शन दिलं आहे. आमच्या भविष्याचं आज आगमन झालं आहे. आमच्यासोबत खेळण्यासाठी एक नवीन बाळ आलं आहे. दहा लहान बोटे, आईचे डोळे आणि वडिलांप्रमाणं नाक...धन्यवाद परी आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल, असं जयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जयनं आपल्या लहान परीच्या पायाला किस करतानाचा फोटो पोस्ट करत त्याला खास कॅप्शन दिलं आहे. आमच्या भविष्याचं आज आगमन झालं आहे. आमच्यासोबत खेळण्यासाठी एक नवीन बाळ आलं आहे. दहा लहान बोटे, आईचे डोळे आणि वडिलांप्रमाणं नाक...धन्यवाद परी आम्हाला पालक म्हणून निवडल्याबद्दल...मुलीचं आगमन, असं जयनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर दुसरीकडे माहीनंही पोस्ट शेअर करत या बाळासाठी देवाचे आभार मानले आहेत. माझ्या जीवलग मैत्रीणीचं आगमन आणि माझं जग बदललं, असं माहीनं यात म्हटलं आहे. दरम्यान या जोडीनं २०१० मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर तब्बल ९ वर्षांने त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा आला आहे.