महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIDEO: सुशांत संजनाच्या 'दिल बेचारा'ची खास झलक - sushant singh rajput

दिल बेचारा चित्रपट हॉलिवूडच्या द फॉल्ट इन आवर स्टार्स चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. हॉलिवूडच्या या चित्रपटाला आज ५ वर्ष पूर्ण झाले असून याच निमित्ताने या दोन्ही चित्रपटांतील काही दृश्यांचा मिळून हा व्हिडिओ तयार केला गेला आहे.

सुशांत संजनाच्या 'दिल बेचारा'ची खास झलक

By

Published : Jul 4, 2019, 12:04 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या 'दिल बेचारा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आता या चित्रपटाची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी हा व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि नवोदित अभिनेत्री संजना सांघी गाडीवर बसलेले दिसत आहेत. दिल बेचारा चित्रपट हॉलिवूडच्या द फॉल्ट इन आवर स्टार्स चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. हॉलिवूडच्या या चित्रपटाला आज ५ वर्ष पूर्ण झाले असून याच निमित्ताने या दोन्ही चित्रपटांतील काही दृश्यांचा मिळून हा व्हिडिओ तयार केला गेला आहे.

सारखंच जग, मात्र वेगळे कलाकार असं या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. मुकेश छाबरा दिल बेचारा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. सुशांतचे चाहते आतुरतेने वाट पाहत असलेला हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details