मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख तिच्या गोड हास्यासाठी ओळखली जाते. इंस्टाग्रामवर जेनेलिया डिसोझाचे ५७ लाखाहून अधिक चाहते आहेत. या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. जेनेलियाने पुन्हा एकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ती सांगत आहे की कधीकधी तीसुद्धा थोडीशी ब्रट्टी (Bratty) होते. ब्रटी म्हणजे खराब वागणे.
जेनेलिया देशमुखने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती मॅथ्यू डेव्हिड मॉरिस यांच्या 'लिटल बिट' गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. ती ग्रीन टॉप आणि जीन्समध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱयावर उमटलेले भावदेखील पाहण्यासारखे आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, - "कारण ब्रटी बनणे ही माझी खासियत आहे."