मुंबई- बॉलिवूडमधील मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि जेनिलिया नेहमीच आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच जेनिलियाने रितेशचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. हा लूक रितेशने जेनिलियासाठी केला आहे.
जेनिलियासाठी रितेशनं केला 'असा' लूक, सोशल मीडियावर झाला ट्रोल - caption
रितेशने आपला हेअर कट बदलला असून केसांना रेड स्क्वाइरल टेल केला आहे. जेनिलियाने हा फोटो शेअर करत त्याला कॅप्शनही दिलं आहे.
रितेशने आपला हेअर कट बदलला असून केसांना रेड स्क्वाइरल टेल केला आहे. जेनिलियाने हा फोटो शेअर करत त्याला कॅप्शनही दिलं आहे. मी रितेशला म्हटलं, की तू काहीतरी नवा लूक कर आणि मल सरप्राईज दे आणि तो रेड स्क्वाइरल टेल करून माझ्या समोर आला. हा लूक कूल नाही का? असा सवाल जेनिलियाने केला आहे.
जेनिलियाच्या या प्रश्नाचे उत्तर देत अनेकांनी रितेशच्या या लूकची खिल्ली उडवली आहे. कामाबद्दल बोलायचे झाल्यास रितेश देशमुख लवकरच 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो 'मरजावां' चित्रपटातही झळकणार आहे.