मुंबई- महाराष्ट्राची सून अशी ओळख असणाऱ्या जेनिलियाचा आज वाढदिवस. जेनिलियाचा जन्म २ ऑगस्ट १९८७ला मुंबईत झाला. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चित्रपटात तिनं रितेशसोबत स्क्रीन शेअर केली.
हॅपी बर्थडे बायको, रितेशनं जेनिलियाला वाढदिवसाच्या अशा दिल्या शुभेच्छा - लय भारी
जीवन हे खुप आनंददायी आहे, जेव्हा तुमची घट्ट मैत्रीण तुमची आयुष्यभरासाठीची जोडीदार बनते. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. तू एक उत्तम आई आहेस, संपूर्ण कुटंबाला एकत्र ठेवण्यात तुझा मोलाचा वाटा आहे, असं रितेश म्हणाला
दरम्यान आज वाढदिवसानिमित्त रितेशनं आपल्या पत्नीसाठी खास मेसेज लिहित तिला शुभेच्छा दिल्या आहेत. जीवन हे खुप आनंददायी आहे, जेव्हा तुमची घट्ट मैत्रीण तुमची आयुष्यभरासाठीची जोडीदार बनते. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. तू एक उत्तम आई आहेस, संपूर्ण कुटंबाला एकत्र ठेवण्यात तुझा मोलाचा वाटा आहे.
या जन्मात तू केलेल्या या सर्व चांगल्या कामांसाठी देव तुला पुढच्या जन्मातही हाच पती देवो, अशी प्रार्थना करतो, असं रितेश पुढे म्हणाला. दरम्यान रितेश आणि जेनिलियानं आतापर्यंत 'तुझे मेरी कसम', 'मस्ती', 'तेरे नाल लव हो गया' आणि 'लय भारी'सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. २०१२ मध्ये या जोडीनं लग्नगाठ बांधली.