महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Gehraiyaan : मानवी नात्यांची गुंतागुंत आणि दबलेल्या भावनांचा उद्रेक दिसेल ‘गेहराईयां’मध्ये - सिद्धांत चतुर्वेदी

धर्मा प्रॉडक्शन्स आणि व्हायकॉम 18 यांची जॉस्का फिल्म्सच्या सहकार्याने संयुक्त निर्मिती असलेला ‘गेहराईयां’ चित्रपट १९ फेब्रुवारीला ( Gehraiyaan Release Date ) ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर ( Amazon Prime Video ) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ), सिद्धांत चतुर्वेदी ( Siddhant Chaturvedi ), अनन्या पांडे ( Ananya Pandey ), धैर्य कारवा ( Dhairya Karwa ) यांच्या प्रमुख भूमिका असून नसिरूद्दीन शहा आणि रजत कपूर हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.

गेहराईया
गेहराईया

By

Published : Jan 22, 2022, 4:47 PM IST

मुंबई - धर्मा प्रॉडक्शन्स आणि व्हायकॉम 18 यांची जॉस्का फिल्म्सच्या सहकार्याने संयुक्त निर्मिती असलेला ‘गेहराईयां’ चित्रपट १९ फेब्रुवारीला ( Gehraiyaan Release Date ) ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर ( Amazon Prime Video ) प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधुनिक जीवनातील मानवी नात्यांमधील गुंतागुंतीच्या नाट्यावर आधारित असून शकुन बत्रा दिग्दर्शित ( Film Director Shakun Batra ) या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ), सिद्धांत चतुर्वेदी ( Siddhant Chaturvedi ), अनन्या पांडे ( Ananya Pandey ), धैर्य कारवा ( Dhairya Karwa ) यांच्या प्रमुख भूमिका असून नसिरूद्दीन शहा आणि रजत कपूर हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.

‘गेहराईयां’ च्या कथानकात ३० वर्षांची, महत्त्वाकांक्षी आलिशा खन्ना पेचात पडली आहे. सहा वर्षांपासून सुरू असलेले तिचे नाते एकसुरी झाले आहे. करियरमध्येही बऱ्याच अडचणी सुरू आहेत आणि हे वास्तव बदलता येण्यासारखे नाही हे स्वीकारत असतानाच तिची लांबची बहीण टिया आणि तिचा होणारा नवरा झायन यांच्या येऊन तिच्या आयुष्याचा जणू कब्जा घेतात. ती त्यांच्यापाशी आपल्या त्रासदायक भूतकाळाबद्दल आणि त्या साखळ्यांमधून मोकळे होण्याविषयी व्यक्त होते. कथेमध्ये आलिशा आणि झायन यांचा आपल्या भूतकाळातील आठवणींशी सामना करण्याचा प्रवास शिवाय भूतकाळ टाळण्यासाठी स्वीकारलेला मार्ग रेखाटलेला आहे.

या सिनेमाविषयी दीपिका पदुकोण म्हणाली, “नातेसंबंध आणि मानवी नात्यांबद्दल भाष्य करण्यात शकुन कुशल आहे. गेहराइंयामध्ये त्याने सर्वांना आपलीशी वाटेल, अशी गोष्ट गुंफली आहे. ‘ गेहराईयां’मधली माझी व्यक्तीरेखा निश्चितपणे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे. एकाचवेळेस मजेदार आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. यातील प्रत्येक भूमिकेचा प्रवास, मार्ग, संघर्ष मनाला भिडणारा असून तो सच्चा, नैसर्गिक आणि आपलासा वाटणारा आहे.”

अनन्या पांडे म्हणाली, “गेहराईयां’ च्या गोष्टीत एकप्रकारचा वास्तववादीपणा आहे. हा सिनेमा नात्यांची गुंतागुंत उलगडत असला, तरी प्रेमात जाणवणाऱ्या थरारावर, आपला शोध घेण्यावर तसेच मार्ग तयार करण्यावर तो भाष्य करतो. टियाची व्यक्तीरेखा साकारणे मला खूप आवडले आणि ज्या पद्धतीने शकुनने प्रत्येक व्यक्तीरेखेच्या पद्धती हाताळल्या आहेत आणि आपल्या अनोख्या मार्गाने आमच्यातील सर्वोत्तम कसब बाहेर आणले ते खरंच असामान्य आहे. ‘गेहराईयां’चे सहकलाकार आणि तंत्रज्ञांबरोबर काम करणे हे मला सर्वोच्च आनंद देणारे होते. शूटिंग कधीच संपू नये, असे मला वाटत होते.”

धैर्य कारवा म्हणाला, ‘गुणवत्तापूर्ण कलाकार आणि निर्मात्यांबरोबर काम करण्याचा अनुभव जबरदस्त होता आणि माझ्या तो कायम लक्षात राहील. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून गेहराईयां जगभरात प्रदर्शित होत असल्याचा मला आनंद वाटतो. यामुळे हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. प्रेक्षक या सिनेमावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’

सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला. “अभिनेता म्हणून माझा प्रवास ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरून सुरू झाला आणि गेहराइयांसारखा माझ्यासाठी अभिमानास्पद असलेल्या सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर होत आहे. एकप्रकारे मला घरी परत आल्यासारखे वाटत आहे. माझ्या मते, आपल्या सर्वांचे व्यक्तिमत्त्व थोडेफार झायनसारखेच असते. त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, स्वप्नांप्रती ध्यास आणि अवघड पर्याय समोर आल्यानंतर होणारा संघर्ष सर्वांनाच आपलासा वाटणारा आहे. या सिनेमाचा प्रीमियमर जागतिक प्रेक्षकांसाठी २४० देशांत होत असल्याने मी थरारून गेलो आहे.”

ABOUT THE AUTHOR

...view details