मुंबई- अभिनेता आयुष्मान खुराणा लवकरच ड्रीम गर्ल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमातील राधे राधे गाणं प्रदर्शित झालं. यानंतर आता चित्रपटातील पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गाण्याचा टीझर शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
'राधे राधे'च्या यशानंतर आता 'ड्रीम गर्ल'मधील पार्टी साँग येणार प्रेक्षकांच्या भेटीस - खुशबू ग्रीवाल
गाण्याला मनमित सिंग, हरमित सिंग आणि खुशबी ग्रीवाल यांनी आवाज दिला आहे. तर मित ब्रदर्सनेच या गाण्याला म्यूझिक दिलं आहे आणि ते कंपोज केलं आहे. या गाण्यात आयुष्मान आणि नुसरत भारुचा ठुमके लगावताना दिसत आहे.
गाण्याला मनमित सिंग, हरमित सिंग आणि खुशबू ग्रीवाल यांनी आवाज दिला आहे. तर मित ब्रदर्सनेच या गाण्याला म्यूझिक दिलं आहे आणि ते कंपोज केलं आहे. या गाण्यात आयुष्मान आणि नुसरत भारुचा ठुमके लगावताना दिसत आहे. संपूर्ण गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान या चित्रपटात आयुष्मानचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. रामाच्या सीतेपासून कॉल सेंटरमधून एका मुलीच्या आवाजात बोलत अनेकांना भूरळ घालणाऱ्या पुजाच्या भूमिकेत तो यात दिसणार आहे. येत्या १३ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.