अलिकडेच अफगाणीस्तानवर स्थानिक तालिबान गटाने हल्ला करुन देशाच्या सत्तेवर कब्जा केला. गेल्या 20 वर्षापासून अमेरिकन सैन्याच्या मदतीने सुरू असलेली अफगाणमधील लोकशाही रुजवण्याची प्रक्रिया यामुळे धुळीस मिळाली. तालिबान्यांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सामान्य नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. अफगणाच्या विमानतळावर जीव वाचवण्यासाठी लोकांनी केलेली गर्दी आणि त्यानंतर उद्भवलेली परस्थिती याच्या बातम्या जगभर झळकल्या. याच संकटातून नागरिकांची सुटका करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहीमेवर आधारित ''गरुड'' हा चित्रपट बनणार आहे.
अफगाण रेस्क्यू संकटावर चित्रपट "गरुड" हा चित्रपट बनववला जाणार असल्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. 'अटॅक' या जॉन अब्राहमसोबतच्या चित्रपटानंतर निर्माता अजय कपूर 'गरुड'ची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे संगीतकार रवी बसरुर असतील.