महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'ची घोडदौड सुरूच, वाचा तिसऱ्या दिवशीची कमाई - आलिया भट्टची गंगूबाई काठियावाडी

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जोरदार प्रतिसाद मिळाला असून पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने 39.12 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाचे कलेक्शन 10.5 कोटी रुपये होते.

आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी
आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी

By

Published : Feb 28, 2022, 5:06 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "गंगुबाई काठियावाडी" ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि पहिल्या वीकेंडमध्ये 39.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आलिया भट्टची प्रमपख भूमिका असलेला हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता. चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 10.5 कोटी रुपये होते.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केले की, 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षक सिनेमागृहाकडे वळले आहेत. चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही मोठा नफा कमावला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' ही गंगा नावाच्या एका तरुणीची कथा आहे, जी कामाठीपुरा येथील रेड लाईट एरियामध्ये मॅडम गंगूबाई बनते. या चित्रपटाची कथा गंगूबाई हरजीवनदास यांच्या सत्यकथेवर आधारित आहे, ज्यांना गंगूबाई कोठेवाली या नावाने ओळखले जाते. हा चित्रपट एस हुसैन जैदी लिखित 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे.

या चित्रपटात आलिया भट्टशिवाय अभिनेता अजय देवगण, विजय राज आणि अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सीमा पाहवा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आलिया भट्टने मुंबईच्या रस्त्यावर उतरत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते.

हेही वाचा -गूढ पोस्टने चाहत्यांची काळजी वाढल्यानंतर अमिताभने केला खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details