मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी 'गेम ओव्हर' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली. 'गेम ओव्हर' हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
ठरलं तर! 'या' दिवशी होणार तापसीचा 'गेम ओव्हर' - teaser
तापसीच्या गेम ओव्हर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आपल्या ट्विटर अकाऊटवरून एक फोटो शेअर करत तापसीने ही तारीख सांगितली आहे.
आता चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती देत, तुम्ही या चित्रपटाचा टीझर पाहिला की नाही? असा सवालही तापसीने केला आहे.
या ट्विटसोबतच तिने आपला एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात तिचा अर्धा चेहरा पाहायला मिळत आहे. दरम्यान गेम ओव्हर चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू, अशा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. अश्विन सारावनन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अनुराग कश्यप यांची निर्मिती आहे.