मुंबई- अभिनेता आयुष्मान खुराणा सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकतंच त्याच्या 'बधाई हो' चित्रपटाला आणि 'अंधाधून'मधील अभिनयाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्यानंतर अनेक कलाकारांनी या यशासाठी त्याचं अभिनंदन केलं. आता बधाई हो चित्रपटात आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या गजराज रावनंही आयुष्मानसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
गजराज रावनं शेअर केला आयुष्मानसोबतचा फोटो, कॅप्शन वाचून वाटेल अभिमान - निना गुप्ता
अनेक महत्त्वाच्या कथा सिनेमाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणारा प्रतिभावान, हुशार आणि प्रेमळ अभिनेता. मला या कलाकाराचा अभिमान आहे. स्वतःला मी नशीबवान समजतो, असं गजराज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अनेक महत्त्वाच्या कथा सिनेमाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणारा प्रतिभावान, हुशार आणि प्रेमळ अभिनेता. मला या कलाकाराचा अभिमान आहे. स्वतःला मी नशीबवान समजतो, की आयुष्मानसोबत काम करण्याची आणि त्याला जाणून घेण्याची संधी मला मिळाली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी त्याचं अभिनंदन, असं गजराज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आयुष्माननं यासाठी त्यांचे आभार मानत गज्जू सर धन्यावाद, असं उत्तर दिलं आहे. दरम्यान अमित शर्मा यांचं दिग्दर्शन असलेल्या बधाई हो सिनेमात आयुष्मान खुराणा, निना गुप्ता, गजराज राव, सुरेखा सिकरी आणि सान्या मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.