मुंबई- अभिनेता अर्जुन रामपालने बुधवारी सोशल मीडियावर आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएला डीमेट्रिएड्सचे दोन फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये गॅब्रिएलाने परिधान केलेला शर्ट अर्जुनचा आहे. या फोटोमध्ये गॅब्रिएला आपला मुलगा अरिकबरोबर रस्त्यावर फिरताना दिसत आहे. अर्जुनने फोटोच्या खॅप्शनमध्ये लिहिले आहे, "जेव्हा ती आमच्या मुलाला फिरायला घेऊन जाते तेव्हा ती माझा शर्ट उधार घेते."
अभिनेता अर्जुन रामपाल सध्या गॅब्रिएला आणि त्याच्या मुलासह बुडापेस्टमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.
या प्रवासाविषयी माहिती देताना अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते, "मी कामावर जाण्यापूर्वी, कुटुंबासमवेत काही क्वालिटी टाईम.."