मुंबई -राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना अभिनेत्री दिशा पाटनीने ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिशाच्या शुभेच्छा ट्विटला नेटकऱ्यांनी गमतीशीर उत्तरे दिली आहेत. यातील काहींनी तर तिला वहिनी म्हणत रीट्विट केले आहे. विशेष म्हणजे आज दिशा पाटनीचा देखील २८ वा वाढदिवस आहे.
दिशा पाटनीने बिर्थडे बॉय आदित्यला ट्विटवर दिल्या शुभेच्छा; नेटकऱ्यांची रंगली मजेशीर चर्चा - दिशा पाटनी आदित्य ठाकरे शुभेच्छा
काही महिन्यांपूर्वीच दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज वाढदिवसानिमित्त दिशाने आदित्यला दिलेल्या शुभेच्छांमुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा दोघांविषयी चर्चा रंगली. दिशाच्या शुभेच्छा ट्विटला नेटकऱ्यांनी गमतीशीर उत्तरे दिली आहेत. यातील काहींनी तर तिला वहिनी म्हणत रीट्विट केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. मग ते तिच्या चित्रपटातील अभिनय असो, तिची ड्रेसिंग स्टाईल असो किंवा इंस्टाग्राम पोस्टअसो. काही महिन्यांपूर्वीच दिशा पाटनी आणि आदित्य ठाकरे यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या दोघांबद्दल अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांच्या फक्त भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे दोघांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. आज वाढदिवसानिमित्त दिशाने आदित्यला दिलेल्या शुभेच्छांमुळे नेटकऱ्यांमध्ये पुन्हा दोघांविषयी चर्चा रंगली.
राज्यात सध्या असणाऱ्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करता रूग्णांना आणि मुख्यमंत्री निधीला मदत करण्याचे आवाहन त्यांच्या चाहत्यांना केले होते. आज राज्यात गोरगरिबांना, रूग्णांना मदत करत तर काही ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजित करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनेक मंत्री, नेते, उद्योग जगत आणि बॉलिवूडमधील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदित्य यांना शुभेच्छा दिल्या.