महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फुक्रे -3' चे शूट सुरू, वरुण शर्माने शेअर केला सेटवरील फोटो - Varun Sharma shared a picture

भरपूर कॉमेडी असलेला चित्रपट 'फुक्रे 3' चे शूटिंग सुरु झाले आहे. चित्रपटाचा अभिनेता वरुण शर्माने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

'फुक्रे -3' चे शूट सुरू,
'फुक्रे -3' चे शूट सुरू,

By

Published : Mar 4, 2022, 4:46 PM IST

मुंबई - कॉमेडी फ्रँचायझी 'फुक्रे' चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन पुनरागमन करत आहे. चित्रपट मालिकेत चुचा सिंगची भूमिका करणाऱ्या अभिनेता वरुण शर्माने गुरुवारी इंस्टाग्रामवर 'फुक्रे 3' फ्लोअर पोहोचल्याची बातमी शेअर केली आहे. त्याने चित्रपटाच्या क्लॅपरबोर्डचा फोटो शेअर केला आहे

लोकप्रिय फिल्म फ्रँचायझी भारतीय सिनेमाच्या कल्ट क्लासिक्सपैकी एक मानली जाते. प्रेक्षकांना एक हसण्याचा तल्लीन अनुभव देण्यासाठी ओळखला गेलेला हा चित्रपट हिट ठरला होता.

फुक्रे 3 चित्रपटात पुलकित सम्राट, अली फजल, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मृघदीप सिंग लांबा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करत आहेत.

हेही वाचा -रशिया युक्रेन युद्धादरम्यान शाहरुख खान स्पेनमध्ये करणार 'पठाण' चे शुटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details