मुंबई - सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे बॉलीवूड कलाकार देखील घरात बसून आहेत. बरेच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. सध्या असेच काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा पूर्ण कुटुंबासोबत चा एक जुना फोटो, सोनम कपूर, करीना कपूर, बोनी कपूर, श्रीदेवी, यांचे जुने फोटो समोर आले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 'शोले' चित्रपटाच्या प्रिमियर दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांच्यासह जया बच्चन, त्यांची आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन यांची झलक पाहायला मिळते. अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर करून शोले चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सोनम कपूरने एका लग्नसमारंभात काढलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या मैत्रिणीसोबत चा आहे. यामध्ये तिची बहिण रेहा कपूर तसेच फॅशन डिझायनर असलेली मसाबा गुप्ता यांच्यासह तिच्या इतर मैत्रिणींची झलक पाहायला मिळते. याशिवाय तिने तिच्या बालपणीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.