मुंबई -हॉलिवूडची लोकप्रिय 'फ्रेंड्स' या मालिकेतील कलाकार एका कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा एकत्र येणार होते. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे या कार्यक्रमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे 'फ्रेंड्स'चं रियुनियन पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
हॉलिवूडच्या 'फ्रेंड्स' या मालिकेची आजही तरुणाईमध्ये क्रेझ पाहिली जाते. ही मालिका संपल्यानंतरही यातील कलाकारांची तुफान लोकप्रियता आहे. या मालिकेतील कलाकारांनी पुन्हा एकत्र यावे, अशी चाहत्यांची इच्छा होती. त्यांची हीच इच्छा पूर्ण करत फ्रेंड्सचे कलाकार, जेनिफर एनिस्टन, कॉर्टनी कॉक्स, लीजा कुडरो, मैट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेविड श्वीमर हे पुन्हा एका कार्यक्रमाच्या भागात एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
हेही वाचा -'कोरोना गो', ढिंचॅक पूजानेही तयार केलं गाणं