महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

SRK Birthday : मित्र, कुटुंबिय, सेलिब्रेटींकडून शाहरुखवर शुभेच्छांचा वर्षाव - Shah Rukh Khan latest news

सुपरस्टार शाहरुख खानचा आद ५५ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावरुन त्याला जोरदार शुभेच्छा दिल्या जात आहेत. यात सेलिब्रेटींसह चाहते आणि लेक सुहानानेही शुभेच्छा दिल्या आहे.

Shah Rukh
शाहरुखवर केला शुभेच्छांचा वर्षाव

By

Published : Nov 2, 2020, 7:06 PM IST

मुंबई - शाहरुख खानच्या ५५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला जगभरातील चाहत्यांसह बॉलिवूडचे सहकारी कलाकार आणि कुटुंबियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता आयुष्यमान खुराणाने प्रेम व्यक्त करीत किंग खानला शुभेच्छा दिल्या.

शाहरुखसह एक फोटो शेअर करीत आयुष्यमानने लिहिलंय, ''तुम्हाला पाहिलं आणि प्रेम झालं. प्रेम कसे करायचे हे तुमच्याकडून शिकावे. तुमच्यासारखा बनायचा प्रयत्न करतोय. परंतु तुमच्यासारखा कोणी होऊ शकत नाही.'' त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे.

अभिनेता राजकुमार राव हा शाहरुखचा मोठा चाहता आहे. त्याने 'छैय्यां छैय्यां' गाण्यावर शाहरुखसोबत रिहर्सल करतानाची एक क्लिप शेअर केली आहे.

शाहरुखची जवळची मैत्रीण जूही चावलाने त्याच्या वाढदिवसानिमित्य ५०० झाडे लावणार असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे.'

शिल्पा शेट्टीने लिहिलंय, ''माझा पहिला हिरो बाजीगरला जन्मदिवसाच्या शुभेच्छा.''

अनुष्का म्हणते, ''तुमच्यातील आकर्षकपणा, बुध्दीमत्ता आणि मोकळेपणा यासाठी जन्मदिनाच्या शुभेच्छा.''

अभिनेत्री करीना कपूरने लिहलंय, "हॅप्पी बर्थडे किंग खान .. चला नेहमी मस्तीत नेहमी डान्स करीत राहा. तुम्ही आमचे सर्वात प्रिय, दयाळू सुपरस्टटार आहात.''

माधुरी दीक्षितनेही शाहरुखला शुभेच्छा देताना लिहिलंय, ''जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा भरपूर मजामस्ती, जादु आणि प्रेम मिळते. सुरक्षित राहा. लवकरच भेटूयात.''

सध्या शाहरुख खान इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) साठी सध्या आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी युएईमध्ये आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची लेक सुहानाने त्याला भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details