महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

विद्यार्थ्यांसाठी 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचा मोफत शो - चित्रपट मोफत

युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल गौरव आणि अभिमान वृद्धीगत व्हावा तसेच कारगिल विजयाची प्रेरणा तरुण युवकांना मिळावी असा यामागचा उद्देश होता. नागपुरातील सर्वच चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविण्यात आल्याने विद्यार्थी, युवकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांसाठी 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचा मोफत शो

By

Published : Jul 28, 2019, 9:25 AM IST

नागपूर- २६ जुलैला कारगिल विजय दिनानिमित्त नागपुरात जिल्हा प्रशासनातर्फे 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' हा चित्रपट विद्यार्थ्यांना निशुल्क दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढावी याच उद्देशाने हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवण्यात आला होता.

युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल गौरव आणि अभिमान वृद्धीगत व्हावा तसेच कारगिल विजयाची प्रेरणा तरुण युवकांना मिळावी असा यामागचा उद्देश होता. नागपुरात जिल्हा प्रशासनातर्फे शाळकरी विद्यार्थी आणि युवकांनाही 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट मोफत दाखविण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाचा मोफत शो

नागपुरातील सर्वच चित्रपटगृहात हा चित्रपट दाखविण्यात आल्याने विद्यार्थी, युवकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारीसुद्धा चित्रपटगृहात पोहचून विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिनानिमित्त मार्गदर्शन करताना यावेळी दिसले. यासाठी तरूणांनी आनंद व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाने आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details