मुंबई:अनुप जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय जाधव निभावत असून, कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. चित्रीकरणही सुरु झाले आहे. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी 'रावरंभा'चे लेखन केले आहे. इतिहासाच्या पानांत ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ती या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.
'रावरंभा' या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत. बेभान, झाला बोभाटा, भिरकीट असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. संजय जाधव हे प्रयोगशील सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाचे छायांकन करतानाही ते त्यांच्यातील प्रयोगशीलतेचा प्रत्यय प्रेक्षकांना नक्कीच देतील.
Sanjay Jadhav Photographing : ‘रावरंभा’ साठी दिग्दर्शक संजय जाधव प्रथमच करणार ऐतिहासिक चित्रपटाचे छायाचित्रण!
‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक संजय जाधव (director Sanjay Jadhav) यांनी ‘चेकमेट’, ‘रिंगा रिंगा’ आणि ‘फक्त लढा म्हणा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याआधी त्यांनी अनेक चित्रपटांच्या छायाचित्रणाची जबाबदारी उचलली होती. त्यामुळेच ते दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून सुपरिचित आहेत.ते प्रथमच ऐतिहासिक चित्रपटाचे छायांकन (For first time photographing a historical film) करण्यासाठी सज्ज आहेत.
दिग्दर्शक संजय जाधव