नवी दिल्ली - कबीर सिंह आणि गुड न्युजसारख्या चित्रपटांमधून नावारुपास आलेली बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने थोड्याच काळात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती येत्या काळात अक्षय कुमारबरोबर लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील एक गाणे बुर्ज खलिफाच्या शुटींगदरम्यानचा एक रंजक किस्सा तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
कियाराने या गाण्याच्या शुटींगबाबतचा हा किस्सा तिच्या इंस्टाग्राम पेजवर एका फोटोसह शेअर केला आहे. या फोटोत ती सोनेरी रंगाच्या कपड्यांसह मॅचिंग मास्क घालून दिसत आहे. बुर्ज खलिफा गाण्याचे चित्रीकरण शुटींगदरम्यानच्या सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक असल्याचे, फोटोसह दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.